चिक्कोडी उपविभागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हुक्केरी, चिक्कोडी, रायबाग, कागवाड, निपाणी अथणी तालुक्यातील तसेच कणगला गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे लोटवाहत आहेत.
काल सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी गावात घराघरात पाणी शिरले असून, पावसाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पेरणीच्या कामासाठी सज्ज झाले आहेत.
निपाणी तालुक्यातील लखनापुर मनोजवाडी व चिकलवाल गावात मुसळधार पावसामुळे एक मिनी ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकल्याने वाहनचालक गाडी सोडून पळून गेला आहे .


Recent Comments