अंत्यसंस्कारावेळी मृतदेहावर ठाण मांडून बसलेल्या माकडांमुळे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद परिसरात हा प्रकार घडला आहे.
धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद शहरातील बसवेश्वर नगर येथील रवि मांग्रे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार क्रिया सुरु असताना अचानकपणे आलेल्या माकडाने मृतदेहावर ठाण मांडले. मृतदेहावर बसलेल्या माकडाला खाली उतरविण्यासाठी उपस्थितांनी अनेक प्रयत्न केले. परंतु अखेरच्या क्षणापर्यंत माकड मृतदेहावरून खाली उतरलेच नाही. अखेर अग्निविधिदरम्यान मृतदेहाला अग्नी देण्यात आल्यानंतर माकड खाली उतरले. घडल्या प्रकाराबाबत उपस्थितातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.


Recent Comments