हुबळीतील अंजली हिरेमठ हत्येमागे निरंजन हिरेमठ यांचे पीए इराण्णा यांचाही हात असल्याचा आरोप झाल्यानंतर अंजलीच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बेंडीगेरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

इराण्णा हे मृत नेहाच्या वडिलांचे पीए म्हणून काम करत होते. १५ मे रोजी अंजलीच्या हत्याप्रकरणी त्यांचाही हात असल्याचा आरोप करण्यात आला. इराण्णा यांनाही अटक करण्यात यावी अशी मागणी अंजलीची बहीण यशोदाने केली. दोन दिवसांपूर्वी हुबळी बसवनगर येथे यशोदाचे पती शिवकुमार यांनी इराण्णा यांची रस्त्यावर अडवणूक करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप इराण्णा यांनी केला आहे. याप्रकरणी बेंडीगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाय शिवकुमार यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


Recent Comments