कालव्यात तोल जाऊन पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना विजयपूमधील इंडी तालुक्यातील हिरेमसळी परिसरात घडली आहे.

हिरेरोगी गावच्या २८ वर्षीय महादेव मंडोदगी या युवकाचा मृत्यू झाला असून अद्याप मृतदेहाचा शोध लागला नाही. मृत युवकाच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाच्यावतीने शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. कालव्याचे पाणी पंपसेटच्या माध्यमातून आपल्या शेतजमिनीला सोडण्यासाठी गेलेल्या युवकाचा तोल जाऊन पडल्याने पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. इंडी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत सदर घटना घडली आहे.
Recent Comments