आजचे तरुण-तरुणी सुशिक्षित आहेत, नोकरी करतात आणि लाखोंची कमाई करतात. परंतु त्यांच्या अहंकारामुळे वैवाहिक जीवन विस्कळीत होत असून, वैवाहिक जीवनात तडजोड केल्याशिवाय सुखी संसार होऊ शकत नाही असे मत कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामी यांनी व्यक्त केले.
कारंजी मठाच्या 275 व्या मासिक शिवानुभव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
गुरुसिद्ध स्वामी पुढे म्हणाले कि पती चुकत असेल तर त्याला सावध करणे, समजावून सांगणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांना ओळखणे गरजेचे आहे. तरच कुटुंब आनंदी राहू शकते.
यावेळी यरगट्टी येथील सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालयाचे कन्नड प्राध्यापक डॉ. राजशेखर बिरादार यांनी “बसवाडी शरण आदर्श विवाह” या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानात बोलताना डॉ. राजशेखर बिरादार यांनी पती पत्नीच्या नात्यात विश्वास असणे गरजेचे आहे असे सांगितले.


Recent Comments