धारवाड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रल्हाद जोशी पाचव्यांदा निवडून आल्याने धारवाड भाजपच्या जल्लोषाला उधाण आले. धारवाड ग्रामीण युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील भाजप सदस्यांनी भाजप समर्थक घोषणाबाजी करत प्रल्हाद जोशींच्या विजयाचा आनंद साजरा केला.
मंगळवारी धारवाड कृषी विश्व विद्यालयाच्या मुख्य इमारतीत मतमोजणी पार पडली. सायंकाळी अंतिम निकाल जाहीर होताच भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण पहायला मिळाले. विजयाची खात्री असल्याने कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात आलेल्या प्रल्हाद जोशींवर आधीपासूनच कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रल्हाद जोशींचे पुष्पहार घालून स्वागत केले. यासोबतच प्रल्हाद जोशी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार प्रल्हाद जोशींनी सर्व कार्यकर्त्यांचेही आभार व्यक्त केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत जल्लोषातविजयोत्सव साजरा केला.


Recent Comments