विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळवून देणाऱ्या अथणी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी यावेळी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराला अधिक पसंती दिल्याचे मतमोजणीदरम्यान पुढे आले आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवार नाकारल्याने भाजपाला राम राम ठोकून काँग्रेस प्रवेश केलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या बालेकिल्ल्यातील जनतेने काँग्रेसपेक्षाही भाजपाला अधिक प्राधान्य दिले आहे. भाजप विरोधात ५० हजारांहून अधिक मताधिक्याने विधानसभा निवडणुकीत विजयी ठरलेल्या सवदींच्या अथणी मतदार संघातून लोकसभा निवडणुकीला मात्र जनतेने भाजपच्या उमेदवाराला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. या भागातून काँग्रेसला अधिक मताधिक्य मिळेल, अशी आशा होती परंतु जनतेने भाजपाला दिलेली मतांची आघाडी पाहता हि आशा फोल ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. चिक्कोडी लोकसभा मतदार संघाचे पराभूत उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांना या भागातून ९ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.


Recent Comments