election

कागवाडच्या जनतेचे आम. राजू कागेंनी मानले आभार

Share

 

 

 

कागवाड आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील जागरुक मतदारांनी आपला हक्क बजावत आमच्यावर विश्वास दाखवत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना एक लाखाहून अधिक मतांनी विजयी केले याबद्दल मी त्याचा ऋणी आहे. जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांनी दिली.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू कागे यांनी आपल्या उगार येथील कार्यालयात टीव्हीच्या माध्यमातून आकडेवारी पाहिली. उपलब्ध होणाऱ्या आकडेवारीनुसार पक्ष कार्यकर्त्यांसोबत माहिती शेअर करत विजय संपादन केल्यानंतर कार्यकर्त्यांना मिठाई वाटून तसेच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत, फटाके फोडून आनंद व्यक्त केला. (फ्लो)

यावेळी बोलताना आमदार राजू कागे म्हणाले, राज्यातील निकालाबाबत वेगवेगळी माहिती उपलब्ध झाली होती. काँग्रेसचे दोनपेक्षा अधिक उमेदवार निवडून येणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मतदारांनी काँग्रेसला अनेक ठिकाणी पाठिंबा दिला असून चिक्कोडी मतदार संघातील उमेदवाराला बहुमत दिले आहे. संपूर्ण देशातही काँग्रेसच्या बाजूने जनतेचा कौल वाढला असून आपण जनतेचे आभार मानत आहोत असे ते म्हणाले.

यावेळी कागवाड काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष विजय अकिवाटे, कृष्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वाघमोडे, संयोजक सौरभ पाटील यांच्यासोबत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कागवाड मधील जनसेवक गटाचे नेते विनायक कांबळे यांचा वाढदिवस देखील आमदारांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सदाशिव बुटाळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य विनायक बागडी, अशोक पुजारी, आप्पासाहेब चौगुले, कागवाड रायत सेवा संघाचे अध्यक्ष शांतीनाथ करव, आदिनाथ कारव, रोहित बसनायक, अरुण वाघमोडे, गणेश निमकर, सचिन कांबळे, दीपक पाटील, अमर जगताप, सतीश जगताप, बाळू कटगेरी, रावसाहेब जयगोंडे, अधिवक्ता संतोष सालीमठ, सौ.सुनंदा नायक, सौ.जयश्री चौघुले, आप्पासाहेब दरगजे, आमदारांचे निकटवर्तीय मल्हारी कटकर, कुमार पाटील, मोहन सदलगे आदी उपस्थित होते. यावेळी कागवाडसह, शेडबाळ, शिरगुप्पी, ऐनापुर, मोळे, मंगसुळी, उगार आदी गावातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

Tags: