election

संपूर्ण हिंदुस्थानने मोदीना स्पष्टपणे नाकारले आहे : राहुल गांधी

Share

 

आम्ही संविधान टिकवण्यासाठी लढलो. ती लढाई आम्ही जिंकली आहे, असे काँग्रेसचे राहुल गांधी म्हणाले.
दिल्ली काँग्रेस कार्यालयात बोलताना राहुल गांधी म्हणले कि , पंतप्रधान मोदींना देशातील जनतेने साफ नाकारले आहे. देशातील गरीब, दलित, आदिवासी आणि इतरांनी भाजपची राजवट नाकारली आहे, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सीबीआय, ईडी इत्यादी तपास यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत. या देशात संविधान आणि लोकशाही टिकवायची असेल तर त्यांचा पराभव होणे अपरिहार्य होते. पीएम मोदींचा पराभव आणि अदानी यांचा पराभव इतका जवळून जुळला की NDA पडल्यामुळे अदानीचे शेअर्स पडले. त्यांच्या नात्याला यापेक्षा जास्त पुराव्याची गरज नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.

एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, काँग्रेस पक्ष जात जनगणना करेल आणि भाग्य लक्ष्मी योजना राबवेल, उद्याच्या बैठकीवर सर्व काही अवलंबून आहे. हे आमच्या मित्रपक्षांच्या निर्णयावर अवलंबून आहे,” त्यांनी टोला लगावला की तुम्ही आमची सर्व रणनीती इथे ऐकली तर मोदीजी ऐकतील.

Tags: