लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत असतानाच टीव्हीवर जाहीर होणाऱ्या आकडेवारीत एनडीए पिछाडीवर असल्याचे पाहून एका भाजप समर्थकाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिवप्रकाश हिरेमठ असे दुर्दैवी भाजप समर्थकाचे नाव असून टीव्हीवर जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा परिणाम पाहून हि घटना घडल्याचे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३०० जागा पार करता आल्या नाहीत याचे दुःख झाल्याने टीव्ही पाहताना ते जागीच कोसळल्याचे सांगण्यात आले आहे.
Recent Comments