Athani

नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पडला २० फूट खोल खड्ड्यात

Share

अथणी तालुक्यातील जनवाड गावात नियंत्रण सुटून ट्रॅक्टर 20 फूट खोल खड्ड्यात ट्रॅक्टर कोसळला .

हिप्परगी पुलापासून जनवाड गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे टायर घसरल्याने हा अपघात झाला. जनवाड गावाला जोडण्यासाठी सुव्यवस्थित रस्ता नसल्याने आठवड्यातून बरेचदा या ठिकाणी लहान मोठे अपघात होत असून स्थानिकांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .

अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्या गृह मतदारसंघात अनागोंदी असून या सहा हजार लोकसंख्येच्या गावात बस येत नाही ही खरोखरच शोकांतिका आहे. गावात दवाखाना किंवा जनावरांचे दवाखाना नसल्याने लोकांचे रोजच हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर जनवाड गावापर्यंत शास्त्रोक्त पद्धतीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Tags: