लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून बेळगाव शहरातील आरपीडी महाविद्यालयात मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राच्या परिसरात येणाऱ्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 4 जून रोजी आरपीडी महाविद्यालय परिसरातील एसकेई भंडारी कन्नड माध्यमिक शाळा, एसकेई भंडारी मराठी माध्यमिक शाळा, डिव्हाईन प्रोव्हिडन्स इंग्रजी माध्यमाची शाळा, स्वाध्याय विद्यामंदिर शाळा, टिळकवाडी एच.एस. टिळकवाडी,
बालिका आदर्श शाळा, केएचपीएस क्रमांक: 5 टिळकवाडी, एमएचपीएस क्रमांक: 9 टिळकवाडी, जी.जी. चिटणीस, गोमटेश विद्यापीठ सर्व शाळा, केएलएस पब्लिक स्कूल, जैन हेरिटेज स्कूल, गोमटेश कॉलेज, हिंदवाडी, केएलएस गोगटे कॉलेज, टिळकवाडी, आर.एल. लॉ कॉलेज, टिळकवाडी, आरपीडी कॉलेज,
टिळकवाडी, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, जैन कॉलेज हिंदवाडी, प्रेरणा कॉलेज, हिंदवाडी आदी शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गैरसोय निर्माण होऊ नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीचा आदेश जाहीर केला आहे.


Recent Comments