Dharwad

विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने इस्माईल समर्थकांचे आंदोलन

Share

 

धारवाडचे काँग्रेस नेते इस्माईल तमटगार यांना विधान परिषदेचे तिकीट शेवटच्या क्षणी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी आंदोलन छेडले.

धारवाड येथील आंबेडकर स्मारकासमोर काँग्रेस नेते इस्माईल तमटगार यांच्या समर्थकांनी आंदोलन छेडले. काँग्रेस पक्षाने उत्तर कर्नाटकावर अन्याय केला आहे. विधान परिषदेचे तिकीट इस्माईल तमटगार यांना देण्यासंदर्भात जवळपास निश्चित झाल्याचे सांगून अखेरच्या क्षणी त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने समर्थक संतप्त झाले.

Tags: