Chikkodi

एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही : सतीश जारकीहोळी

Share

 

निकालासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असून कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली आहे.

चिक्कोडी शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस मागे पडल्याचे काही पोल सांगत आहेत. या एक्झिट पोलवर आपला विश्वास नाही. काँग्रेस आघाडी सत्तेवर येणार असल्याचे संकेत काही पोलने आधीच दिले आहेत. याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. निकालासाठी जास्त वेळ शिल्लक नाही. यामुळे निकालासंदर्भात अनावश्यक चर्चा करण्याची गरज नसून निकालानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे जारकीहोळी म्हणाले.

Tags: