Education

अखेर चन्नेवाडी शाळेला आज पासून प्रारंभ

Share

 

खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेल्या शाळेला आज सुरुवात झाली,
गेल्या महिन्याभरापासून पालक व गावकऱ्यांनी तालुका गट शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांची भेट घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्या संदर्भात निवेदन दिले होते, त्यानंतर बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता, या द्वयींनी सकारात्मकता दाखवल्याने गावातील युवकांनी श्रमदानाने शाळेचा परिसर स्वछ करून डागडुजी केली, आज अखेर ३ जून रोजी पहिलीतील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांनी शाळेत स्वागत केले, तत्पूर्वी फुगे,पताक्यांनी सजविलेल्या बैलगाडीतून गावात मिरवणूक काढण्यात आली, शाळेचा परिसर स्वच्छ करून आंबोत्या व पताक्यांनी सुशोभित करण्यात आला होता, विध्यार्थ्याच्या स्वागतासाठी स्वागत कमान घालून फुलांच्या उधळणीने स्वागत करण्यात आले, शाळेच्या प्रवेश द्वारावरील फित प्रमुख पाहुण्या राजश्री कुडची यांच्या हस्ते कापून व शाळेची घंटा वाजवून चालना देण्यात आली, यावेळी छोटेखानी कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक प्रकाश पाटील होते , तर प्रमुख पाहुण्या तालुका गाशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची होत्या, व्यासपीठावर सीआरपी डी,एम,बागवान,यामुना पाटील, शाळेचे नूतन शिक्षक प्रकाश देसाई हे होते,
प्राथमिक शिक्षण तेही मातृभाषेत का घ्यावे यावर कुडची यांनी मार्गदर्शन केले, इतरांचीही समयोचित भाषणे झाली, सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले तर आभार फोंडु पाटील यांनी मानले,
यावेळी निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील,दिलीप पाटील,यशवंत पाटील,शिवाजी पाटील,किरण पाटील,पांडू पाटील, नागोजी पाटील,भरमाजी पाटील,शंकर पाटील,मुरलीधर पाटील,लक्ष्मण पाटील,दत्ताराम पाटील,उदय पाटील,सुधाकर पाटील,विशाल पाटील,महादेव ऱ्हाटोळकर,पांडुरंग ऱ्हाटोळकर, ईश्वर पाटील,स्वागत पाटील,हरिष पाटील, सर्वोत्तम पाटील,स्वप्नील पाटील आदीं उपस्थित होते.

Tags: