बागलकोट शहरातील एमआरएन (निराणी) आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील शारीरिक चिन्तन 2024 परिषदेत बेळगावच्या केएलई संस्थेच्या श्री बी.एम कंकणवाडी आयुर्वेद विद्यापीठाचे प्राध्यापक व फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ.महांतेश रामण्णावर याना शरिर रत्न 2024 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले .
डॉ.महांतेश रामण्णावर यांनी आपल्या वडिलांच्या देहाचे विच्छेदन करून वैद्यकीय क्षेत्र दानाचे दूत, आयुर्वेदिक वैद्यकीय अध्यापन सेवा आणि देहदान आणि अवयवदानाची जनजागृती करण्याची निस्वार्थ सेवा केली. त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी राज्यसभा सदस्य नारायणसा भंडगे, संचालक एमआरएन (निराणी) ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी संगमेश निरानी, तेजस इंटरनॅशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा माधुरी मुधोल, डॉ. गणेश पुट्टुर , एमआरएन कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद गंगावती, डॉ. शिवकुमार गांगल, डॉ.मुरुलीधर बडिगेर उपस्थित होते.
डॉ.रामण्णवरयाना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केएलई आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहासकुमार शेट्टी, शिक्षक व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


Recent Comments