Dharwad

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Share

तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धारवाडच्या नवलगुंद तालुक्यातील हळे कुसुगल गावात रविवारी सायंकाळी उशिरा घडली.

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील हळे कुसुगल गावातील तलावात ही दुर्घटना घडली. दावलसाब मकतुमासाब हेबसुर (२४) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गावातील रहिवासी आहे. तलावाजवळ खेळत असलेल्या युवकांनी तलावात एक व्यक्ती बुडत असल्याचे पाहून ग्रामस्थांना माहिती दिली.

ग्रामस्थांच्या माहितीवरून अंनिगेरी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडला नसल्याने आज पहाटेपासून मृतदेह शोधण्यास सुरुवात झाली . मृतदेह शोधण्यात विलंब होत असल्याने आता नवलगुंद पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली आहे. ही घटना नवलगुंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला आहे

Tags: