अकोळ – लखनापूर येथे भर रस्त्यात बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील शेतकरी गंभीर जखमी झाला. शेतकरी प्रकाश आप्पासाहेब पाटील (50) हे गंभीर जखमी झाले. प्रकाश पाटील यांचा शेतीचा व्यवसाय असून ते मूळचे बेडकिहाळ येथील आहेत. शेतीसाठी कुटुंबासह नेझ येथे राहतात.

निप्पाणीतील काम आटोपून तो नेज गावी जात असताना निपाणीहून इचलकरंजीकडे निघालेल्या बसने लखनापुर गावातील निर्वासित वसाहतीजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली . . यावेळी प्रकाश खाली पडून गंभीर जखमी झाला. याप्रकरणी निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments