आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ८ जून रोजी हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिरात योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एम. बी. जिरली यांनी दिली.
आज आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. २१ जून रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर के. एल. इ. सेंटेनरी हॉल, जेएनएमसी कॅम्पसमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अबालवृद्धांसह सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सुहास कुमार शेट्टी म्हणाले, 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 8 जून रोजी गुरुदेव रानडे मंदिर, हिंदवाडी येथे योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत योगप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेत 8 ते 12, 13 ते 17, 18 ते 22 वर्षांवरील मुले आणि मुली तसेच २३ वर्षांवरील प्रत्येकाला या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना केएलई सेन्टेनरी सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात आकर्षक पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत डॉ. सुहासकुमार शेट्टी, डॉ. अशोक पाटील, एम.बी. जिरली उपस्थित होते.


Recent Comments