Belagavi

शिंदोळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण

Share

शिंदोळी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भव्य मिरवणूक काढून ग्रामस्थांनी जल्लोष केला.

शिंदोळी गावातील आंबेडकर गल्ली येथे निलजी ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या अनुदानातून मंजूर झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करून ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश शहापूरकर यांच्याहस्ते कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यानंतर संपूर्ण गावात मिरवणुकीने पुतळ्याची स्थापना करण्यात आली.

यावेळी ग्राम पंचायत सदस्य बाबागौड पाटील, पिराजी अंगोळकर, सविता मुचंडी, सुनीता तळवार, मोनेश मातारी, गंगाप्पा शहापूरकर, शीला तिप्पन्नगोळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: