बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील सवदी गावातील जय कर्नाटक संघटनेच्या शाखेचे उदघाटन अथणी आयबी येथे अत्यंत साधेपणाने पार पडले व त्यानंतर माता भुवनेश्वरीच्या प्रतिमेचे पूजन करून पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सवदी गावच्या अध्यक्षपदी बसवराज बागेन्नवर तर उपाध्यक्षपदी सुशांत तेली यांची निवड करण्याचे आदेश जय कर्नाटक संघटनेचे अथणी तालुकाध्यक्ष आकाश नंदगाव, प्रशांत रेडीज यांनी दिले. बिरेश बागेन्नवर महांतेश बागेन्नवर, सिद्धलिंग सारवाड , बसवराज खोत दानेश टक्कनवर व संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व नेत्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम यशस्वी झाला.


Recent Comments