karnatak

देशातील जनता मोदींना स्वीकारत नाही : मल्लिकार्जुन खर्गे

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलले तरी देशातील जनता त्यांना आता स्वीकारणार नाही, असा दावा एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि देशात सर्वसमावेशक आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन होईल, असा विश्वास मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळतील. भाजपाला आंध्रमध्ये अत्यंत कमी जागा मिळतील. देशात युतीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

भाजपचा हेतू चांगला असता 30 लाख रिक्त सरकारी पदे गरीब, दलित आणि मागासवर्गीयांना देऊन भरता आली असती. पण त्यांनी ते केले नाही. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी एकदाही बेरोजगारीच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला.

Tags: