Belagavi

बेळगावमध्ये साजरा झाला जागतिक परिचारिका दिन

Share

बेळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग स्कुलच्यावतीने जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला.

बेळगावमधील कुमार गंधर्व रंगमंदिरात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. गुरुराज, डॉ.अशोककुमार शेट्टी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालय तसेच नर्सिंग स्कुलच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उडुपी मानसोपचार नर्सिंग विभागाचे डॉ. गुरुराज, बीम्स महाविद्यालयाचे प्रमुख आणि संचालक अशोक कुमार शेट्टी उपस्थित होते. यावेळी डॉ. ए. बी. पाटील, डॉ. इराण्णा पल्लेद, डॉ. विठ्ठल शिंदे, सरोज तिगडी, एल. एस. पंगन्नावर, नामदेव माळगी, प्रकाश कोडली, व्यंकटेश आदींसह नर्सिंग स्कुलचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: