देशातील मुले गुटखा, धूम्रपानाच्या व्यसनाला बळी पडत आहेत याबाबत न्यायमूर्ती मुरली मोहन रेड्डी यांनी चिंता व्यक्त केली. आज बेळगावमध्ये जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या सभागृहत जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, जिल्हा सर्वेक्षण युनिट, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बीम्स मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. तंबाखूपासून मुलांचे संरक्षण या घोषवाक्याखाली आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती मुरली मोहन रेड्डी यांच्याहस्ते पार पडले.

यावेळी बोलताना न्यायमूर्ती मुरली मोहन रेड्डी म्हणाले, तंबाखूचे व्यसन पुरुषांसोबत महिलांमध्येही आढळून येत आहे. इतकेच नव्हे तर १० वर्ष वयोगटातील मुलेही तंबाखूच्या व्यसनाला बळी पडत आहेत. त्यामुळे वयाच्या ३०व्या वर्षीच कर्करोग आणि हृदयाशी संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता आहे. आनंदासाठी सुरु केलेल्या व्यसनामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बीम्समधील विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त जागृती नाटकाचे सादरीकरण केले. बसवराज यलीगार यांनी सूत्रसंचलन केले तर डॉ. श्वेता पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले. यावेळी डॉ. महेश कोणी, डॉ. एस. व्ही. मुन्याळ, अशोक कुमार शेट्टी, डॉ. संजय दोडमनी, न्या. मुरली मोहन रेड्डी, डॉ. पल्लेद, डॉ. सरोजा तिगडी, डॉ. आर. जी. विवेकी, डॉ. संजय डुमगोळ, डॉ. श्वेता पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments