बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांना भ्रष्टाचाराविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी व्यक्त केली.
शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. भ्रष्टाचाराविषयी बोलणाऱ्या आमदार अभय पाटील हे स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराविषयी का बोलत नाहीत असा सवाल सुजित मुळगुंद यांनी केला. अभय पाटील यांनी केलेले भ्रष्टाचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. बेळगाव शहरात पोलिसांनी दडपशाही करून निरपराधांच्या मालमत्ता जप्त करून केलेला अन्याय जनता विसरलेली नाही. अभय पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराची दोन प्रकरणे आहेत. खादरवाडीत भाजप सरकारच्या कालावधीत तेथील जनतेवर पोलिसांच्या दडपशाहीने अन्याय करण्यात आले आहेत, असा आरोप सुजित मुळगुंद यांनी केला.
खाऊ कट्टा गाळेवाटपात अनुसूचित जाती-जमातींना डावलून भ्रष्टाचार करण्यात आला. वॅक्सीन डेपो, स्मार्ट सिटी प्रकल्प अशा अनेक गोष्टींमध्ये आमदार अभय पाटील यांनी भ्रष्टाचार केला असून याबद्दल ते गप्प का आहेत असा सवालही सुजित मुळगुंद यांनी उपस्थित.


Recent Comments