Uncategorized

बियाणे दरवाढीविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

ऐन पेरणीच्या हंगामात झालेल्या बियाणांच्या दरवाढीचा निषेध करत विजयपुरात अखंड कर्नाटक रयत संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

भीषण दुष्काळामुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशातच राज्यातील काँग्रेस सरकारने बियाणांच्या दरात वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बियाणांच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. हि दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी असा आग्रह करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

Tags: