केवळ शिक्षण आणि पदवी मिळवून विद्यार्थी घडतात असे नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत तर त्यांच्या पदवी आणि शिक्षणाला काहीच महत्व नसेल अशी प्रतिक्रिया आमदार राजू कागे यांनी व्यक्त केली.

शेडबाळमध्ये दिवंगत समाजसेवक श्रीशैल सांगले, सुगंधा सांगले यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वृक्षारोपण, वस्त्रदान, अन्नदान करून श्रीशैल सांगले यांचे चिरंजीव चिदानंद सांगळे यांनी केलेल्या कार्याचे आमदारांनी कौतुक केले.

या समारंभास महाराष्ट्रातील आळते गावातील जंगली मठाचे जगद्गुरू बसवकुमार अल्लमप्रभू महास्वामी यांचे दिव्या सानिध्य लाभले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील ज्येष्ठांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
यावेळी बसवराजेन्द्र शरण गुरु, महादेव चिंचली, सांजे मुकुंद, बसाप्पा बेळगली, चिदानंद सांगले, संजय मुकुंद आदी उपस्थित होते.


Recent Comments