Chikkodi

यात्रेतील अन्नसेवनामुळे विषबाधा; ४४ जण अस्वस्थ!

Share

केरुर गावातील बेक्केरी शेतवाडीत काल जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मात्र महाप्रसादामुळे ४४ जणांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची बाब समोर आली असून केरूर आणि एकसंबा येथील रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

चिकोडी येथे झालेल्या यात्रेत महाप्रसादाचे सेवन केलेल्या भाविकांपैकी ४४ जणांची प्रकृती बिघडली असून यापैकी ३१ जणांना चिकोडी सार्वजनिक रुग्णालयात तर केरूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ आणि एकसंबा येथील सार्वजनिक रुग्णालयात ८ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महाप्रसादातून विषबाधा झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून महाप्रसादाचे सेवन केल्यानंतर आमांशामुळे अस्वस्थ झालेल्या रुग्णांमध्ये वृद्ध, पुरुष महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर एडीएचओ एस एस गुडेद, तालुका आरोग्याधिकारी सुकुमार भागाइ आदींनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.

यासंदर्भात चिकोडी रुग्णालयाचे मुख्य वैद्याधिकारी डॉ. महेश नारबेट बोलताना म्हणाले, चिकोडी केरूर येथे आयोजिण्यात आलेल्या यात्रेत महाप्रसाद सेवन केल्यामुळे ४४ जणांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Tags: