महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाला तडे जाऊन मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे . पावसाळ्यात यामुळे मोठा धोका निर्माण होऊन मोठी आपत्ती घडू शकते या भीतीमुळे नागरिक चिंतेत आहेत

काळम्मावाडी धरणाची काळम्मावाडी जलाशयाची क्षमता सुमारे 27 टीएमसी आहे . पावसाळ्यात ते पूर्ण क्षमतेने भरून वाहते . मात्र या धरणाला गळती लागली असून पावसाळ्यात हे धरण फुटून आसपासच्या गावांना धोका संभवतो . या धरणाच्या दुरुस्तीकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केले आहे . त्यामुळे ईहले लोक चिंतेत आहेत .
यासंदर्भत कोल्हापुर दक्षिणचे आ . सतेज पाटील यानापत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले कि , महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी जलाशयासाठी महाराष्ट्र सरकरांकडून निधी मंजूर झाला आहे . याचा डीपीआय देखील मजूर झाला आहे . या धरणाची गळती काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी व्हायला हवे होते . मात्र सरकाराच्या तीव्र दुर्लक्षामुळे हे कामकाज सुरु झालेले नाही . सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन , काळम्मावाडी धरणाची दुरुस्ती करावी अशी मागणी , कोल्हापूर दक्षिणचे आमदार सतेज पाटील यांनी केली .

पाण्याची गळती वाढत असल्याने नागरिक चिंतेत आहेत . काळम्मावाडी जलाशयाची क्षमता सुमारे 27 टीएमसी आहे दूधगंगा नदीच्या पलीकडे हा जलाशय बांधण्यात आला आहे. या धरणाला लागलेल्या गळतीमुळे पावसाळ्यात आमच्या गावांना धोका आहे त्यामुळे सरकारने तातडीने याची दखल घेऊन या धरणाची दुरुस्ती करावी अशी मागणी इथले स्थानिक करीत आहेत . सरकारने तातडीने सतर्क होऊन काळम्मावाडी धरणाची गळती थांबवणे आवश्यक आहे . अन्यथा भविष्यात मोठा अनर्थ घडू शकतो .


Recent Comments