Belagavi

भटक्या कुत्र्यांना करू नका इजा ,त्यांना अन्नपाणी द्या , भूतदया दाखवा

Share

बेळगाव शहर परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . त्यामुळे लोक या कुत्र्यांना मारण्यासाठी अनेक उपाय करीत आहेत . या कुत्र्यांना न मारता त्यांच्या हल्ल्यामाँगील कारणे शोधावीत आणि कुत्र्यांना संरक्षण द्यावे तसेच त्यांना अन्नपाणी देऊन , त्यांची संख्या वाढू नये यासाठी महापालिकेने श्वान नसबंदी मोहीम हाती घ्यावी असा आग्रह , प्राणी विकास समाजसेवी संस्थेचे डॉ . मठपती यांनी केला आहे .

गुरुवारी शहरात पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते . ते पुढे म्हणले कि प्राण्यांना न मारता त्यांना भूतदया दाखवा , त्यांना आपल्या घरातील उरलेले अण्णा आणि पाणी द्या . भटक्या कुत्र्याना खायला मिळत नसल्याने ती आक्रमक होतात . भटक्या कुत्र्यांशी कसे वागावे याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात कारण आपण रोजच लोक कुत्र्यांना दगड, दांडके, काठ्या इ. मारताना पाहतो. आपल्या समाजात प्राणीमित्र वातावरण असले पाहिजे . जनजागृतीद्वारे हे साध्य केले पाहिजे . तसेच मुलांना प्राण्यांबद्दल करुणा दाखवणे, हे पालक आणि शिक्षकांचे कर्तव्य आहे. कोणत्याही कुत्र्याला चिथावणी दिल्याशिवाय तो आपल्याला इजा करणार नाही, त्यामुळे आपल्या मुलांमध्ये प्राण्यांबद्दल योग्य संस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे ते सांगण्यात आले .

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना निकिता या संस्थेच्या सदस्येने सांगितले कि , जशी आम्हाला भूक लागते तशी तशीच भटक्या कुत्र्यांना लागते . सर्व नागरिकांनी आपल्या घरात शिल्लक राहिलेले अन्नपाणी जर त्यांना दिले तर त्यांची भूक मिटेल . प्राणी कधीही स्वतःहून हल्ले करीत नाहीत . त्यांना राग येण्यासारखी कृती जर घडली तर ते परतून हल्ला करतात . जसा माणसाला जगण्याचा अधिकार आहे तसाच प्राण्यांनादेखील आहे . त्यांच्या हक्कांना बाधा निर्माण करू नका .

तर वरुण यांनी कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने त्यांची नसबंदी मोहीम हाती घ्यावी . कर्तृनाच्या त्रासाला कंटाळून त्यांना मारू नका . आपल्या घरातील शिल्लक अन्न त्यांना द्या. महिनाभरात कुत्र्यांना तुमचा लळा लागेल . त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागा असा सल्ला त्यांनी दिला .

यावेळी प्राणी विकास समाजसेवी संस्थेचे प्राणीमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tags: