Belagavi

आशाकिरण निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

Share

बेळगावमधील आशाकिरण मतिमंद मुलांच्या वसती शाळेचा आज काँग्रेस युवा नेत्या प्रियांका जारकीहोळी यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. या शाळेत ६ वर्षांपासून ते २५ वर्षांपर्यंतच्या मतिमंद मुलांना प्रवेश घेता येणार आहे.

कर्नाटक सरकारच्या मान्यताप्राप्त आशाकिरण शाळेचा आज बेळगावमध्ये प्रारंभ करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच बेळगावमधील ऑटोनगर येथे या शाळेचे उद्घाटन आमदार राजू सेठ यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता या शाळेत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या व्यवस्थापनाखाली मतिमंद मुलांसाठी निवासी विशेष शाळा स्थापन करण्यात आली असून 6 ते 25 वयोगटातील मतिमंद मुलांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

या शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त मैदान, मतिमंद मुलांसाठी भोजन, निवासाची सोय, प्रतिभावान शिक्षक आणि सर्वसोयींनीयुक्त इमारतीची सोय आहे. तसेच विविध कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी, स्पर्धा – परीक्षांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देखील देण्यात येते. सरकारतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना बसपास आणि रेल्वेपासची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Tags: