क्रिकेट खेळण्यावरून सुरु झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाल्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करत दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

२१ जानेवारी २०१८ रोजी महाद्वार रोड येथे हा प्रकार घडला होता. वैभव पाटील आणि साक्षीदार ओंकार पाटील, प्रशांत पाटील, अक्षय मन्नोळकर, आदित्य मन्नोळकर सर्वजण राहणार महाद्वार रोड संभाजी गल्ली बेळगाव आणि आरोपी शुभम हदगल, सागर बाळू प्रधान, महेश गुंडू पाटील, युवराज दिलीप पवार, मारुती प्रकाश पाटील, विक्रम पांडुरंग मुतगेकर, इराण्णा सिद्धलिंग बागेवाडी सर्वजण राहणार महाद्वार रोड बेळगाव हे सर्वजण क्रिकेट खेळत होते. दरम्यान यांच्यात सुरु झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने अमृत पाटील आणि ओंकार पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शिवीगाळ करण्यात आली. आरोपी इराण्णा बागेवाडी याने तक्रारदार वैभव याच्यावर चाकू हल्ला केला. यात ओंकार पाटील जखमी झाला. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर कारवाई करण्यात आली असून १०वे उच्च आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती गुरुराज गोपालचार्य शिरोळ यांनी आरोपींना प्रत्येकी ७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


Recent Comments