Bailahongala

बैलहोंगल येथे श्री दुर्गादेवी यात्रा उत्साहात

Share

 

बैलहोंगल जवळील मुरकुंबी गावात श्री दुर्गा देवीची यात्रा मोठ्या थाटामाटात पार पडली.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री दुर्गा देवीची विशेष पूजा करण्यात आली. यावेळी अभिषेक आणि विविध धार्मिक विधी आटोपल्यानंतर प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी उत्साहाने यात्रेत सहभाग घेतला. परगावाहून आलेल्या भाविकांनी दुर्गादेवीला पशुमान दिला. यावेळी घरोघरी पै-पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रा समितीच्या सहकार्याने यात्रा थाटामाटात पार पडली.

Tags: