Khanapur

ईदगाह मैदानाच्या जमिनीची विक्री : पारिश्वाड येथील मुस्लिम बांधवांचा विरोध

Share

 

खानापूर तालुक्यातील पारिश्वाड गावातील ईदगाह मैदानाची जमीन विक्री करण्यात आल्याचे समजताच यावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला आहे.

खानापुर तालुक्यातील पारिश्वाड गावातील सर्व्हे क्र. 21 मध्ये 5 एकर व सर्व्हे नं. 20 मधील 1 एकर जमीन गाडीवाले शबाना अब्दुलराजाक, अब्दुल मुल्ला, इम्रान मुल्ला, फरजाना मुल्ला, हसीना मुल्ला, शबाना मुल्ला यांच्या नावे नोंदवून दुसऱ्याला विक्री करण्यात आली असून याविरोधात पारिश्वाड येथील मुस्लिम समाजाने निषेध व्यक्त केला आहे.

 

 

तहसीलदारांनी तत्काळ वस्तुस्थितीची पडताळणी करून नोंदणी रद्द करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.

Tags: