FUNERAL

शासकीय इतमामात मंजुनाथ अंबडगट्टी यांच्यावर अंत्यसंस्कार

Share

खानापूर तालुक्यातील कक्केरी गावातील मंजुनाथ शिवानंद अंबडगट्टी (35) या भारतीय सैन्य दलातील जवानाचा दिल्ली येथे अपघाती मृत्यू झाला. मृत जवानाचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कक्केरी येथे आणण्यात आल्यानंतर अंबडगट्टी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्यावर शासकीय इतमामात, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय सैन्य दलात इंजिनिअर रेजिमेंटमध्ये 16 वर्षे सेवा बजावत असणाऱ्या मंजुनाथ शिवानंद अंबडगट्टी यांचा गेल्या शुक्रवारी अपघात झाला होता. त्यांच्यावर नवी दिल्ली येथील मिलिटरी बी. एस. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचाराचा फायदा न होता मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत जवान मंजुनाथ अंबडगट्टी यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कक्केरी येथे आणण्यात आल्यानंतर अंबडगट्टी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. २०२५ साली सेवानिवृत्त होऊन कुटुंबासमवेत वेळ घालविण्याचा विचारात असणाऱ्या जवानाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अंत्यदर्शन घेण्यासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. भव्य अंत्ययात्रेद्वारे शोकाकुल वातावरणात मंजुनाथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: