farmers

बियाणांच्या किमती वाढल्याने शेतकरी चिंतेत

Share

 

पावसाळा सुरू झाला की देशातील शेतकऱ्यांसाठी उत्सवाचे वातावरण असते. खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु होते. मशागत, पेरणी यादरम्यान बियाणे आणि खतांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु होते. मात्र यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी खर्चिक ठरत असल्याने बियाणे आणि खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

गडगमधील शिरहट्टी भागात असणाऱ्या शेतकरी संपर्क केंद्रावर बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी वितरित करण्यात येणारे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला. त्याशिवाय गतवेळच्या तुलनेत यावेळी सर्वच बियाणांच्या किमतीत जवळपास ४० टक्के वाढ झाली असून, ही बाब शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचीही संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.

शेतकरी संपर्क केंद्रावर वितरित केल्या जाणाऱ्या बियाणांचा दर्जा निकृष्ट असून, मागील वेळेपेक्षा यावेळी सर्वच बियाणांचे दर जास्त असल्यामुळे बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकरी प्रविण पाटील यांच्यासह सर्वच शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

Tags: