actors

अभिनेता शिवराज कुमारने घेतले सौंदत्ती यल्लम्माचे दर्शन

Share

 

‘उत्तराकाण्ड’ या कन्नड चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेळगावमध्ये आलेले अभिनेते डॉ. शिवराजकुमार यांनी सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीचे दर्शन घेतले.

‘उत्तराकाण्ड’ या कन्नड चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर डॉ. शिवराज कुमार यांनी सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरावरील श्री रेणुकादेवीचे दर्शन घेतले. चित्रीकरण पूर्ण करून आपण देवीचे दर्शन घेतले यासाठी आपण भाग्यवान असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी श्रीराम, मैलारी यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी सौंदत्ती देवीचे दर्शन हि मोलाची आणि यशाची बाब ठरली असून उत्तराकाण्ड चित्रपटाच्या यशासाठी आपण देवीचे आशीर्वाद घेतल्याचे ते म्हणाले. के.आर.जी. स्टुडिओ बॅनरखाली कार्तिक गौडा आणि योगी जी राज निर्मित, रोहित पदकी दिग्दर्शित ‘उत्तरकाण्ड” हा बहुप्रतिक्षित ॲक्शन ड्रामा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहितीही डॉ. शिवराजकुमार यांनी दिली.

Tags: