चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याशेजारी धडकून झालेल्या अपघातात नौदलाच्या जवानाचा जागीच मृत्यू झाला आहे.
हुबळी-गदग या राष्ट्रीय महामार्गावरील अन्नीगेरीजवळील आर्य पुलानजीक ही घटना घडली आहे. दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बॅरिकेडला धडकल्याने संदीप रेड्डी या २६ वर्षीय नौदलाच्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महिनाभराच्या सुट्टीनंतर कारवारला जात असताना ही घटना घडली. मृत जवान मूळचा तेलंगणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली असून अन्नीगेरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात नेला असून याप्रकरणाची नोंद अन्नीगेरी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
Recent Comments