Belagavi

बेळगावचे सहा स्केटिंगपटू ठरले सुवर्णपदकाचे मानकरी

Share

 

गोवा आणि सांगली ओपन रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूनि उत्तम कामगिरी करत बेळगावचे नाव उंचावले आहे.

गोवा आणि सांगली येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये 400 स्केटर्सनी सहभाग घेतला होता. यामध्ये बेळगावच्या स्केटर्सनी 6 सुवर्ण, 3 रौप्य पदके अशी एकूण 9 पदके जिंकली.
जान्हवी तेंडुलकरने 4 सुवर्ण, अर्शन माडीवाले 1 सुवर्ण, 3 रौप्य, सौरभ साळोके 1 सुवर्ण अशी यश संपादन केलेल्या स्केटिंगपटूची नावे आहेत. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरनाथ गौडा आणि विठ्ठल गगने यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Tags: