Belagavi

पॅरा जलतरणपटू श्रीधर माळगी जर्मनीला रवाना

Share

 

आयडीएम बर्लिन वर्ल्ड पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज -2024 आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेतत भाग घेण्यासाठी बेळगावचे पॅरा जलतरणपटू श्रीधर नागप्पा माळगी जर्मनीला रवाना झाले आहेत.

बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांनी जर्मनीकडे प्रयाण केले असून 50 मीटर फ्रीस्टाइल, 200 मीटर आणि 400 मीटर वैयक्तिक मेडल स्पर्धेत श्रीधर माळगी सहभाग घेणार आहेत. वयाच्या सहाव्या वर्षी भीषण रिक्षा अपघातात हात गमवावा लागलेल्या श्रीधर माळगी यांना बसवेश्वर सर्कल येथील रोटरी कॉर्पोरेशन जलतरण तलावाने जलतरण विभागात करियर करण्याची संधी दिली होती. जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांनी श्रीधर माळगी यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना या क्षेत्रात मार्गदर्शन केले.

श्रीधर माळगी यांचा स्पर्धात्मक जलतरणाच्या जगातील प्रवास 2012 मध्ये उमेश कलघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. तेंव्हापासून, श्रीधर मुलगी यांनी 19 आंतरराष्ट्रीय आणि 52 राष्ट्रीय पदके पटकाविली असून यामध्ये असाधारण 36 सुवर्ण, 11 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. श्रीधर माळगी यांनी पोहण्याच्या बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि फ्रीस्टाइल या प्रकारात विषेश प्रावीण्य मिळवले आहे.

श्रीधर माळगी यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन आणि डॉ. प्रभाकर कोरे प्रोत्साहन मिळत आहे. त्याचप्रमाणे जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाऊंडेशन), एसएलके ग्रुप बंगलोर, अलाईड फाउंड्रीज बेळगाव, पॉलिहाइड्रॉन फाउंडेशन, डॉ. नितीन खोत, रो. अविनाश पोतदार, डॉ. राजेंद्र भांडणकर व इतरांचेही प्रोत्साहन लाभत आहे.

Tags: