Belagavi

बेळगावात २ रोजी वधुवर मेळाव्याचे आयोजन

Share

 

बेळगावमध्ये २ जून रोजी वीरशैव लिंगायत व आंतरजातीय वधू-वरांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजक शिवानंद जिरली यांनी दिली.

कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामी, हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन सेवानिवृत्त जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्याहस्ते होणार आहे. रविवार दि. २ जून रोजी सकाळी ११ वाजता लक्ष्मी टेकडी येथील हुक्केरी हिरेमठ येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजवर १७ ठिकाणी मेळावे यशस्वीरीत्या पार पडले असून बेळगावमध्ये १८ वा मेळावा आयोजिण्यात आल्याची माहिती शिवानंद जिरली यांनी दिली.

हुक्केरी तालुका जानपद परिषदेचे अध्यक्ष सुभाष नाईक बोलताना म्हणाले, आजकाल वारांना वधू मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत लिंगायत समाजाच्यावतीने वधुवर मेळावा आयोजिण्यात आला आहे याचा लाभ वीरशैव लिंगायत आणि पोटजातीतील जनतेने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

अलीकडे लग्न जमविणे हि मोठी समस्या बनली आहे. बेरोजगारीमुळे अनेक तरुणांचे विवाह ठरत नाहीत. अशावेळी वधुवर मेळाव्याच्या माध्यमातून

विवाहाच्या वयातील युवकांना वधू मिळत नसल्याने सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. शेतकरी कुटुंबातील तरुणांचे विवाह जमविणे तर त्याहून कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत वधू वर मेळावे उपयोगी ठरू शकतील अशी आशा सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.

Tags: