Belagavi

सिलेंडर स्फोटात मृत्यू झालेल्या वृद्ध दाम्पत्याच्या कुटुंबियांना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची आर्थिक मदत

Share

बेळगावातील सुळगा (उचागाव) गावात सिलिंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याच्या कुटुंबीयांना महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी भेटून आर्थिक मदत दिली.

सुळगा (उचगाव) गावातील कल्लाप्पा पाटील आणि सुमन पाटील या वृद्ध दाम्पत्याचा सिलिंडरचा स्फोट होऊन मृत्यू झाला. बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आर्थिक मदत देऊ केली. तसेच शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या वेळी युवराज कदम, बागण्णा नरोटी, यल्लाप्पा कलखांबकर , मनोज कलखांबकर, गणपत गडकरी, गंगाराम नरोटी आदींचा सहभाग होता.

Tags: