temple jaatra

कवडीमट्टी गावात जुम्मन्ना आज्जाची जत्रा

Share

विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील कवडीमट्टी गावात जुम्मन्ना आज्जाची जत्रा पार पडली .

दर तीन वर्षांतून एकदा होणाऱ्या या जत्रेत भंडाऱ्याची उधळण करीत , एकमेकांवर काठ्यांचा प्रहार करत ही जत्रा साजरी केली जाते . यावेळी हातातील काठ्या तुटतात पण कोणालाही इजा होत नाही .

जुम्मन्ना आज्जाची जत्रा म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या या जत्रेत , हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात . ब्रिटिशांच्या काळात जुम्मन्ना आज्जा ब्रिटिशांविरोधात लढल्याची आठवण म्ह्णून आजही इथले लोक हा काठ्यांचा खेळ खेळतात .

कवडीमट्टी येथील ग्रामस्थ शतकानुशतके ही जत्रा साजरी करत आहेत जत्रेत लोक 1001 काठ्या धरून एकमेकांना ठोकत आहेत (फ्लो )
कोरोनामुळे ही जत्रा 10 वर्षांसाठी स्थगित करण्यात आली होती . मात्र यंदा गावकऱ्यांनी भव्य जत्रा भरवली

Tags: