DEATH

विद्युतभारित तारेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू

Share

शेतात नांगरणी करणाऱ्या एका शेतकऱ्याचा विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील हिरेनदिहल्ली गावात घडली आहे .
कित्तूर तालुक्यातील हिरेनदिहल्ली गावातील शेतकरी मंजुनाथ दसनकोप्प या शेतकऱ्याचा या घटनेत मृत्यू झाला.
पाऊस व वाऱ्यामुळे शेतात विजेच्या तारा तुटून पडल्या होत्या . हे लक्षात न आल्याने , विद्युत तारेवर पाऊल पडल्याने शेतकरी मंजुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला.
शवविच्छेदनासाठी मृतदेह कित्तूर सार्वजनिक रुग्णालयात हलवण्यात आला.
कित्तूर पोलीस ठाण्यात ही घटना घडली.

Tags: