बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होणार असून मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी केली.
४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान कोणत्याही चुका होऊ नयेत, कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत यासाठी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत जागरूक कर्नाटक संघटनेसह विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. (फ्लो)
यावेळी बोलताना शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी म्हणाले, ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान प्रत्येक उमेदवाराला फॉर्म १७ सी देण्यात येतो. यासह १७ मधील माहितीशी जुळणारा फॉर्म बी देखील प्रदान करावा आणि मतमोजणी दरम्यान त्याचे निरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली. ()
यावेळी यल्लापा हेम्मडी, सोमाप्पा बंदुर्गी, शंकर ढवळी, संजीव डोंगरे आदी उपस्थित होते.


Recent Comments