खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून अडीच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी बेळगाव शहरातील कंग्राळ गल्ली येथे घडली आहे .

साईशा संदीप बडवाण्णाचे (वय अडीच वर्षे ) राहणार कंग्राळ गल्ली असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे . नळाला पाणी आल्याने साईशाच्या आईने , घरातील पाण्याच्या टाकीत पाण्याचा पाईप सोडून , झाकण उघडे ठेवले होते . चिमुकली साईशा खेळात खेळात पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचली आणि टाकीत पडली . मात्र दुपारी तिचे वडील घरी येईपर्यंत याची पुसटशी कल्पना कोणाला नव्हती . साईशा कुठे आहे म्हणून शोधाशोध सुरु झाली . संशय आल्याने पाण्याच्या टाकीत डोकावून पहिले असता टाकीत उलटी पडलेली साईशा आढळून आली . तिला ताबडतोब बाहेर कडून रुग्णालयात नेण्यात आले . मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले .
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . खडेबाजार पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे .
Recent Comments