विजयपूर जिल्ह्यात दिवसागणिक डेंग्युबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली असून दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णसंख्येकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.
विजयपूर जिल्ह्यात दिवसागणिक डेंग्युबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. डेंग्यूच्या तापामुळे विजयपूरवासीय हैराण झाले असून याकडे आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या भागात ड्रेनेज आणि गटारींची योग्य व्यवस्था नसल्याने डेंग्यूची व्युत्पत्ती होत असून प्रभाग क्रमांक १० मध्ये संध्याकाळ होताच मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. संध्याकाळनंतर घराबाहेर पडणे मुश्किलीचे झाले असून या भागातील गटारी आणि ड्रेनेज व्यवस्था योग्य रीतीने पुरविण्याची मागणी नागरीकातून आणि प्रामुख्याने महिलावर्गाकडून केली जात आहे.
डेंग्युबाधित रुग्ण रुग्णालयात दाखल होऊन उपचारानंतर घरी परतले आहेत. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधाची फवारणी करण्यात यावी, अशी मागणीही येथील नागरिक करत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात २० हुन अधिक डेंग्युबाधित रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यूला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना आखात सर्व प्रकारची व्यवस्था केल्याचे सांगण्यात येत असून डेंग्यूसदृश्य लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.


Recent Comments