आंतरधर्मीय नोंदणी कायद्याप्रमाणे , प्रत्येक आंतरधर्मीय विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची पडताळणी करून नोंदणी करावी असे निवेदन श्रीराम सेनेच्या वतीने विवाह नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले .
आंतरधर्मीय विवाह नोंदणी कायद्याप्रमाणे प्रत्येक आंतरधर्मीय विवाह नोंदणी करणे अनिवार्य आहे . सर्व कागद पत्रे तसेच विवाह नोंदणीची कागदपत्रे , नोंदणी कार्यालयातील नोटीस बोर्डवर एक महिना लावून सर्व पाडताळणी करून नंतर नोंदणी करावी. सद्या कार्यालयात एजंट राज खूप चालू असुन त्याला आळा घालणे गरजेचे आहे असे श्री राम सेना बेळगाव यांच्या वतीने विवाह नोंदणी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले
ह्या वेळी श्री राम सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल गड्डी, विभागीय अध्यक्ष रविकुमार कोकीतकर, जिल्हा कार्यादर्शी विनय अंग्रोळी तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments