शुक्रवारी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील कडेपूर गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

शुक्रवारी संध्याकाळपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चिकोडी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले असून गावातील सखल भागात पाणीच पाणी दिसून येत आहे.
या भागात राहणाऱ्या यल्लाप्पा कामटे यांच्या घरात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच एका वृद्ध दाम्पत्याच्या घराचे छत उडाले असून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील जवळपास सर्वच भागात हीच परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
एकंदर मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार हजेरीमुळे कडेपूर गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांसाठी पूर्वतयारी म्हणून अधिकारी कोणती उपाययोजना आखतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे


Recent Comments