एका गृहिणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना धारवाडच्या मलमडी वसाहतीत घडली.
भाग्यश्री असे आत्महत्या केलेल्या गृहिणीचे नाव आहे. मूळची बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील भाग्यश्री लग्नानंतर पतीच्या मूळ गावी धारवाड येथे स्थायिक झाली. पतिपत्नीत विविध कारणांवरून अनेकदा भांडण होत असत . याच कारणावरून भाग्यश्रीने घरातच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे
.
याप्रकरणी विद्यागिरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
Recent Comments